धक्कादायक : भाजपा आमदार मुनिरत्नने दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अकडवले,सहा एड्स बाधित महिलांचा सहारा

BJP MLA Munirathna Trapped In Honey Trap : भाजपा आमदार मुनिरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून ‘हनीट्रॅप’ केले. त्यात आमदार, पोलिस अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे.सहा एड्स रुग्णांचा वापर करून दोन माजी मुख्यमंत्र्यांचा ‘हनीट्रॅप’; समोर आली धक्कादायक माहिती
बंगळूर :- भाजपचे आणि माजी मंत्री आमदार मुनिरत्न BJP MLA Munirathna यांनी दोन माजी मुख्यमंत्र्यांना ‘हनीट्रॅप’ Honey Trap करून मंत्रिपद मिळविल्याचा आरोप मुनिरत्न यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या पीडित महिलेने केला आहे.आमदार मुनिरत्न याने एडसची लागण झालेल्या सहा महिला रुग्णांच्या साह्याने कर्नाटकच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून स्वतः मंत्रिपद मिळवले होते, असा खळबळजनक आरोप मुनिरत्न यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या पीडितेने केला.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुनिरत्न याला अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे.बंगळुरु येथे एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडितेने मुनिरत्न याच्यावर हा आरोप केला.मुनिरत्न याने मंत्रिपद मिळविण्यासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांना एडस् झालेल्या महिलांचा वापर करून हनीट्रॅपमध्ये अडकवले. मुनिरत्न याच्याकडे अतिशय प्रगत कॅमेरे आहेत, जे इतर कोणाकडेही नसतील. मुनिरत्न याने बड्या पोलीस अधिकाऱ्यांनाही आमच्यासारख्या असहाय्य महिलांचा वापर करून ब्लॅकमेल केले. त्यांचे अश्लिल व्हिडिओ तयार केले आहेत, असा दावा पीडितेने केला. मुनिरत्न याची ब्रेन मॅपिंग चाचणी घ्यावी,अशी मागणी तिने केली.
मुनिरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून ‘हनीट्रॅप’ केले. त्यात आमदार, पोलिस अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. सुमारे 20 ते 30 राजकीय नेत्यांना हनीट्रॅप करून त्यांचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये ठेवण्यात आल्याचे पीडितेने सांगितले.