क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Swargate Rape Case : स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक ; सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या

Vasant More On Swargate Bus Depo : शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षारक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे :- पुण्यातील स्वारगेट बस स्थानक Swargate Bus Depo परिसरात उभे असलेल्या एका शिवशाही बस मध्ये 26 वर्षे तरुणीवर बलात्काराचे घटना Pune Swargate Bus Depo Rape News आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. ही घटना दुपारी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे Vasant More यांनी स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याचे घटना समोर आली आहे त्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानका परिसरात अवैधरित्या चालू असलेल्या धंद्यांवर देखील यावेळी आरोप केले आहे. अगर प्रमुखाला यावर जबाबदार धरून त्यांच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल करा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे. 20 20 सुरक्षारक्षक असून झोपा काढतात या ठिकाणी महिलांच्या साड्या, कंडोम चे पाकीट, दारूच्या बाटल्या आहेत याचाच अर्थ असा होतो की सुरक्षारक्षकांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे या संपूर्ण घटनेवर कारवाई करावी अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.

वसंत मोरे यांनी गंभीर आरोप करत म्हणाले की येथे रोज बलात्कार होत आहे शेकडो कॉन्डोम चे पॅकेट पडलेली आहे. इथे वीस लोक नेमलेली आहे ती 20 लोक काय करतात असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. शिवशाही नाव असलेल्या बसमध्ये प्रकार घडतो हे अतिशय लज्जास्पद गोष्ट असल्याची वसंत मोरे यांनी म्हणाले आहे. येथे येताना सुरक्षारक्षकांची केबिन ओलांडून यावे लागते याचा अर्थ यात एसटी चे कर्मचारी सहभाग असतात सुरक्षारक्षक सहभागी आहेत. सर्रासपणे बसेस मध्ये लॉजिंग चे सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचा संताप जनक सवाल वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0