धक्कादायक : गतिमंद मुलीची आईकडून विषारी औषध देऊन हत्या

Thane Crime News : गतिमंद आणि असह्य आजार यामुळे अस्वस्थ असलेल्या आईने आपल्या मुलीची विषारी औषध देऊन हत्या केली, आई, आजी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
ठाणे :- नौपाडा पोलिसांनी ठाण्यातील Thane Naupada Police Station एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. एका गतीमंद मुलीच्या आजारपणाच्या वेदना असह्य होत असल्याने तिच्या आईने आणि आजीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशस्वी पवार असे 17 वर्षीय गतिमंद मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात हात्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप चाळ, मंत्री प्लॉट, शिवाजी पथ, ठाणे येथे राहणाऱ्या यशस्वी पवार ही जन्मता अपंग आणि गतिमंद होती. गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड शारीरिक वेदना होत असल्याने ती रात्र रात्रभर ओरडत असायची तिच्या या वेदना तिच्या आईला म्हणजेच स्नेहल राजेश पवार (35 वय) तिला सहन न झाल्याने तिने तिला गुंगीच्या गोळ्या घेऊन तिला ठार मारले. त्यानंतर यशस्वी चा मृतदेह तिच्या आई आणि आजी गावी घेऊन परस्पर अंत्यसंस्कार केले होते. मात्र मुलीची मावस आत्या वर्षा रघुनंदन हिने पोलिसांकडे तक्रार दिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मुलीचे आई स्नेहल राजेश पवार आजी सुरेखा महागडे यांच्यावर कोणाचा दाखल केला असून पोलिसांनी मुलीची आजी सुरेखा महागडे हिला अटक केली आहे. परंतु मुलीची आई अद्यापही फराळ आहे या घटनेमुळे ठाण्यातील जगताप चाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.