Bhiwandi Crime News : भिवंडीत ऑटो-रिक्षा चोरणाऱ्याला अटक, 11 रिक्षा जप्त

•धुळ्यात राहणाऱ्या दोन आरोपींना भिवंडीच्या पाईपलाईन रोड परिसरात अटक, शांतीनगर, नारपोली,बाजारपेठ, कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा रिक्षा चोरीच्या घटना उघडकीस
भिवंडी :- भिवंडीत रिक्षा चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते.भिवंडी गुन्हे शाखेने रिक्षा चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 11 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. वाहन चोरी करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यावेंवर प्रतिबंधक कारवाई सुरु केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय न्याय संगीता कलम 303 (2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या ऑटो रिक्षाच्या पुण्याचा समांतर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विजय कुंभार, अमोल इंगळे, भावेश घरत हे करीत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळी आजूबाजूची उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने चोरट्याने रिक्षा चोरी करत असताना धुळे येथून पुण्यातील चोरी झालेली रिक्षा नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी हस्तगत केली.
चोरीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करीत असताना गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी हे के.जी.एन. रोड चौक 60 फिट रोड पाईपलाईन रोड शांतीनगर भिवंडी या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून धुळ्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अरबाज अल्ताफ शहा (27 वय रा. नटराज टॉकीज च्या समोर तिरंगा चौक धुळे) , सोहेल उर्फ साहिल अल्ताफ शहा (30 वय रा. तिरंगा चौक धुळे) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आरिफ मोहम्मद हुसेन खान (29 वय रा. शांतीनगर भिवंडी) यांना चोरी करून विक्री करण्यासाठी दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तब्बल 11 रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून आरोपींनी यापूर्वी शांतीनगर, नारपोली, बाजारपेठ, कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा रिक्षा चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.