Sanjay Raut’s Controversial Reaction : शिवसेना शिंदे बुळचट, फडणवीसांची गांडू शिवसेना… संजय राऊत यांची वादग्रस्त प्रतिक्रिया

•स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा, फडणवीसांचे सध्या हेच धोरण ; खासदार संजय राऊत यांची टीका
मुंबई :- मुंबईत गुजरातच्या एका कंपनीने मराठी माणसाला नोकरी नाकारल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. “हे खरं आहे. मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करु नये अशी भूमिका घेतली.शिवसेना शिंदेगट ही बुळचट शिवसेना आहे. ही फडणवीसांची गांडू शिवसेना गप्प आहे. हिम्मत असेल आवाज द्या, आम्ही बघतो काय करायचं ते. काल बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या घाटकोपरच्या एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी आहेत म्हणून येण्यापासून रोखलं, ही फडणवीसांची गांडू बुळचट शिवसेना काय करतेय? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने हे आव्हान स्वीकारलय” असं संजय राऊत म्हणाले.त्यावर महाराष्ट्राच सरकार, मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली. मराठी माणसाचा आवाज राहू नये, याच कारणासाठी मोदी-शाहंनी ही शिवसेना तोडली” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही आमचे 40 आमदार का फोडले? त्यावर तुम्ही बोलत नाहीत. शरद पवार आणि आमचे 40 आमदार फोडले, म्हणजे स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा, फडणवीसांचे सध्या हेच धोरण दिसत आहे. स्वतः खा खा शेण खायचं, शेणात तोंड बुडवायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा”, अशी खालच्या पातळीची टीका संजय राऊतांनी केली आहे.
काल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरएसएस समर्थक अधिकाऱ्याने हेमंत करकरेंना गोळी घातली असा आरोप केला होता. यावरून सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. यावरही राऊतांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “काही लोकांनी त्यावेळी प्रश्न उपस्थित केला होता की, हेमंत करकरे यांचे शहीद होणं रहस्यमय आहे, पण हे मी मानत नाही. त्याठिकाणी आणखी पोलिस अधिकारी शहीद झाले. अशोक कामटेंसह तुकाराम ओंबळे, करकरे शहीद झाले. त्यावेळी सर्वात मोठे युद्ध देशाच्या शत्रूबरोबर झाले होते. असे असतानाही हेमंत करकरे यांचे नाव आता पुढे आले आहे, पण विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य पहिल्यांदा केले नाही. यासंदर्भता मी दोन गोष्टी तुमच्यासमोर ठेवतो” असे राऊत म्हणाले.
आरएसएस आणि करकरे यांच्यात संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर चर्चा झाल्या. एटीएसने त्यावेळी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. रमेश उपाध्याय यांनाही अटक केली होती. त्या केसचा अभ्यास मी केला आहे. त्यावेळी आरएसएसचे लोक माझ्याकडे यायचे, करकरेंनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे असं सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबीय माझ्याकडे यायचे. आरएएस आणि करकरेंचा संघर्ष सुरु होता. दुसरी गोष्ट की विजय वडेट्टीवार यांचे नाव का घेता? हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा, ते हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारायचा असेल तर मुश्रीफ यांना विचारा. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके होते. त्यांना अटक झाल्याने संघ आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष सुरू होता” असे राऊत म्हणाले.