Sanjay Raut : शिवसेना खरी आणि डुप्लिकेट हे भारतीय जनता पक्ष ठरू शकत नाही… खासदार संजय राऊत
Sanjay Raut Reply Amit Shah : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा भाजप नेत्यांवर निशाणा साधला
मुंबई :- एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या डुप्लिकेट पक्षांचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. अमित शहा हे नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी राहिलेल्या काँग्रेसची सध्या “तीन तिगाडा, काम बिघाडा” अशी अवस्था झाली असल्याची टीका केली होती. त्यांच्या याच विधानाचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे. Sanjay Raut Reply Amit Shah
खोटे गोटे गळ्यात अडकून फिरत आहात आज प्रसार माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले, “आता तुम्ही शिंदे गट आणि अजित पवार गट पक्षाचे खोटे गोटे गळ्यात अडकून फिरत आहात, हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट पक्षांचा निकाल जनताच लावेलच, असा इशारा राऊतांनी दिला आहे.
नकली शिवसेनाप्रमुखांसमोर नाक रगडण्यासाठी आले पुढे राऊत म्हणाले, “अमित शहा यांनी जे विधान केले आहे ते आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. असली कोण आणि नकली कोण? हे अमित शहा ठरवू शकत नाहीत. उद्धव ठाकरे जर नकली शिवसेनेचे प्रमुख आहेत, तर 2019 साली तुम्ही त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर का आला होतात?” असा खोचक सवालही संजय राऊत यांनी अमित शहांना विचारला आहे. Sanjay Raut Reply Amit Shah
भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकीचे सत्र सुरू
यावेळी राऊतांनी महायुतीला खुले आव्हान दिले आहे. “मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. माझे महायुतीला चॅलेंज आहे, त्यांनी मुंबईतील एकतरी जागा जिंकून दाखवावी. या देशाची जनता लोकसभेची निवडणूक जिंकू देणार नाही”, असे राऊत म्हणाले. तसेच निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून सरपंचांना धमक्या दिल्या जात आहेत, मतदारांना आमिष दिले जात आहे. हातकंगले ते कोकणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकीचे सत्र सुरू आहे”, असा गंभीर आरोप देखील राऊतांनी केला आहे. Sanjay Raut Reply Amit Shah