Share Marketing Fraud : “या” ॲपमधुन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून 9.73 लाखांची फसवणूक
Ullhasnagar Share Market Fraud News : गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितल्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले, ॲप डाऊनलोड केल्यानंतर बँक झाली खाली
उल्हासनगर :- ऑनलाईन शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करणार Ullhasnagar Share Market Fraud असाल तर सावधान रहा ! या ॲप मध्ये गुंतवणूक करून शेअर्स मार्केटमध्ये खरेदी-विक्री अथवा आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हालाही तुमचे बँकेतील पैसे गमवायला लागेल. अशीच एक घटना उल्हासनगर-3 येथे राहणाऱ्या मेडिकल दुकान असणारे एका व्यापाऱ्याबरोबर झाली आहे.Bulk Kotak Al ॲप डाऊनलोड करून यामधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तसेच शेअर्स खरेदी-विक्री केल्यास अधिकचा परतावा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात Ullhasnagar Police Station दाखल करण्यात आली आहे. या फसवणुकीमध्ये मेडिकल व्यापाऱ्याला नऊ लाख 73 हजार 416 रुपये गमवावे लागले आहे. Ullhasnagar Share Market Fraud News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन अंतर्गत राजेंद्र हरिभाऊ ढमाले (43 वर्ष,) रा. शांतीनगर उल्हासनगर-3 येथे राहणाऱ्या एका मेडिकल व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये ढमाले यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप मध्ये कोटक क्लब-411 ग्रुपमध्ये ॲड करून bulk kotak al.. हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर ढमाले यांनी ॲप मध्ये एकूण नऊ लाख 73 हजार 416 रुपये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. परंतु कालांतराने त्यांना कोणत्याही प्रकारे गुंतवणूक केलेले पैशाचा मोबदला न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश सावंत करत आहे. Ullhasnagar Share Market Fraud News