Share Market Scam : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक
•शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून फसवणूक
ठाणे :- ऑनलाइन शेअर ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक च्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक होत असल्याच्या घटना अनेक वेळा पोलीस ठाण्यात नोंदविला जात आहे. या फसवणुकीमध्ये अनेक वेळा गुन्ह्याची सारखी कार्यप्रणाली वापरली जाते. ज्यामध्ये ऑनलाईन शेअर ट्रेडिंग केल्यास किंवा गुंतवणूक केल्यास अधिक आर्थिक मोबदला मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची घटना तक्रारदाराने नोंदवली आहे.
फिर्यादी सुदेश प्रभाकर भायदे,(35 वर्ष) व्यवसाय नोकरी, रा.ऐरोली, नवी मुंबई यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने कॉल करून, शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी यांना आरोपी याने त्याचे बॅंक खातेवर एकुण 4 लाख 98 हजार रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप हे करीत आहेत.