Trendy Topic in Maharashtra : Thane Police’s Successful Drug Bust
मुंब्रातील तरुणाकडे एम.डी.पावडर(मेफेड्रॉन) अंमली पदार्थ पोलिसांकडून अटक
•अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या मुंब्रातील तरुणाला अंमली पदार्थ सह अटक
ठाणे :- अंमली पदार्थाचे जाळे ठाण्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खोलवर रुतलेले आहे. यामध्ये तरुण पिढीला मोठ्या प्रमाणावर एमडी, गांजा यांसारख्या अमली पदार्थाच्या सेवांचे अधीन होऊ लागलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि ठाणे पोलीस आयुक्तांना सुचवले की शहरात मोठ्या प्रमाणावर तरुणांकडे अंमली पदार्थ खरेदी विक्री केली जात असून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला आहे असे सांगितले होते. त्यामुळे ठाण्यासह महाराष्ट्राला अंमली पदार्थाने घेरलेले आहे का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. ललित पाटील प्रकरणानंतर अब्जाधीशा अंमली पदार्थाचे कारखाने उध्वस्त केल्याच्या घटना चालू आहे. अंमली पदार्थाचे सेवन करून पुण्यात मोठी घटना घडली आहे अशा अनेक उदाहरणं अमली पदार्थाचे देता येईल त्यामुळे महाराष्ट्राला अंमली पदार्थाने घेरलेले आहे. मुंब्रा येथील एका तरुणाला (22 वर्षे) अंमली पदार्थाची खरेदी विक्री करताना पोलिसांनी अटक केली आहे.
30 मे रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास, मुंब्रा पोलीस ठाणे पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार, पोलीस शिपाई खान व त्यांचे पथकाने, वाय जंक्शन ब्रीज खाली, मुंब्रा येथे सापळा रचुन आरोपी कामरान नफिस शेख, (22 वर्ष), रा.चर्नीपाडा, कौसा, मुंब्रा यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे एम.डी.पावडर(मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ, एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन व टीव्हीएस मोटार सायकल असा एकुण 2 लाख 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगुन वाहतुक करीत असताना मिळुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींविरूध्द गुन्हा एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 22 (क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी कामरान नफिस शेख, (22 वर्ष) यास अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार हे करीत आहेत.