Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक, अंबरनाथ मधील घटना
•पाच लाख 29 हजाराची आर्थिक फसवणूक, पोलिसांकडून आरोपीचा शोध
अंबरनाथ :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून एका तरुणाची पाच लाख 29 हजाराची फसवणूकदाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाला ROARK ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. Share Market Fraud
अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे मध्ये तक्रार करण्यात आली की, 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ते 08 फेब्रुवारी 2024 रोजी चे दरम्यान, फिर्यादी अनिकेत रामचंद्र गुप्ता, (36 वर्षे), व्यवसाय-नोकरी, रा.अंबरनाथ पश्चिम यांना अनोळखी मोबाईलधारक महिला व इसमाने व्हॉट्स ऐप मॅसेज करून ROARK ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपमधील खात्यामधुन शेअर मार्केट मंध्ये गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळण्याचे अमिष दाखवुन एकुण पाच लाख 29 हजार रूपये रक्कम आरोपीत यांचे विविध बँक खातेवर ऑनलाईन वळती करण्यास सांगुन ते परत न करता फिर्यादी आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीने आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे हे करीत आहेत. Share Market Fraud