पुणे

Daund Water News : भीम नगरला होणाऱ्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

[ दौंड नगरपरिषदेला नागरिकांचे निवेदन ]

Daund BMC Water : दौंड, ता. ७ दौंड नगरपरिषदेचा पाणी प्रश्न हा कायमच कळीचा मुद्दा राहिला असून त्याबरोबर नागरिकांना गढूळ पाण्याची Muddy Water चर्चा कायमच रंगत असते. दौंड नगरपरिषद पाणी कर घेऊन ही नागरिकांना पिण्यासाठी अतिशय गढूळ पाणी करत असल्याचा कारणावरून दौंड तालुका बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष विशाल सोनवणे यांनी नगरपारिषदेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून दौंड मधील प्रभाग ६ मधील नागरिकांच्या नशीबी अस्वच्छ पाणी व निकृष्ट कामे असल्याचा घणाघात विशाल सोनवणे यांनी एका प्रसिध्दी पञकान्वये केला आहे. Daund BMC Muddy Water

दौंड शहरात भीम नगर प्रभाग ६ मध्ये नगरपरिषद मार्फत अतिशय गढूळ, मैला, शेवाळ युक्त, गटारीचे ड्रेनेजचे काळे पाण्या सारखे अतिशय घाण वास येत असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्याने नागरिक, महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दौंड शहरातील प्रभाग ६ मधील पूर्ण भाग १९७२ पासून अस्तित्वात असलेल्या पाइपलाइन मधून अजूनही पाणी पुरवठा होत आहे. या भागातील सर्व नळ कनेक्शन धारकांनी सदर अनामत रक्कम भरली असून सर्वांना नवीन पाइपलाइन मधून नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. परंतु त्या नवीन कनेक्शनला पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. जुन्या पाइपलाइन मधून जो पाणी पुरवठा होतो आहे ती पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे त्या पाइपलाइन मध्ये गटारीचे ड्रेनेजचे काळे पाणी पाझरत असून ते घाण पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होत आहे. Daund BMC Muddy Water

त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा People Health Problem प्रश्न निर्माण झाला असून ताबडतोब जुन्या पाइपलाइनचा पाणी पुरवठा बंद करून नवीन पाइपलाइन मधून पाणी पुरवठा सुरळीत करुन दिलासा देणे गरजेचे असून त्यांची या काळ्या पाण्याची शिक्षेतून मुक्तता करणे गरजेचे आहे. प्रशासनाला साधी माणुसकी राहिली नाही. आम्ही दररोज कसे जगतो याचे भान तरी नगरपरिषदेने ठेवावे अशा शब्दात येथील महिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे. निवेदनावर मनोज सोनवणे, सुभाष कांबळे, शैलेश सोनवणे, सुनिल शिंदे, महेश सर्वगोड, सतिश वाल्मिकी आदिंच्या स्वाक्षरी आहेत. Daund BMC Muddy Water

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0