Sharad Pawar : “पावसात चिंब झाले शिक्षक, आझाद मैदानात अन्यायाविरुद्ध लढा!”

- “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार… त्याच्या डोळ्यांत अश्रू का?” – शरद पवारांचा सवाल
मुंबई | आझाद मैदानात आज शिक्षकांच्या अनुदान आणि मान्यतेसंबंधी न्याय्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभं राहिलं आहे. पाच हजारांहून अधिक विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांचे शिक्षक, थोडंसं सरकार ऐकावं म्हणून पावसात चिंब होऊन चिखलात बसलेत.
ऑक्टोबर 2024 मध्येच शासन निर्णय जाहीर झाला होता, मात्र आजतागायत अनुदानासाठी निधीची तरतूद झाली नाही. त्यामुळे शिक्षकांना आंदोलनाच्या मार्गावर यावं लागलं आहे. या लढ्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार) शरद पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे.
शरद पवारांचा थेट इशारा – “तुम्ही चिंता करू नका, मी आहे!”
आंदोलक शिक्षकांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले,”आज चिखलात बसलेला हा शिक्षक, उद्याचं नवं महाराष्ट्र घडवतोय. त्याला संघर्षाची वेळ येऊ नये. राज्यकर्त्यांना माझं आवाहन आहे, या प्रश्नावर एक दिवसात तोडगा काढा!”
ते पुढे म्हणाले,”मी 1980 साली मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही शिक्षक आंदोलन करत होते. पहिल्यांदा मीच केंद्र देतं तसं राज्यही देईल असा निर्णय घेतला होता. आजही तशीच जबाबदारी घेण्याची वेळ राज्य सरकारवर आहे.”
पाऊस, चिखल, अपमान… शिक्षक सहन करतोय, पण आता थांबवा!”
शरद पवार यांनी फडणवीसांना थेट उद्देशून सांगितलं,”मी 56 वर्षं विधानमंडळ, संसद पाहिली आहे. तरतुदी कशा करायच्या,अंमलबजावणी कशी करायची हे मला माहीत आहे. फक्त इच्छाशक्ती लागते.”
ते म्हणाले,”शिक्षकांचे डोळे ओले आहेत, पण मनात दिवा आहे. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. तुम्ही काही काळजी करू नका.”



