Sharad Pawar : शरद पवार यांनी एकनाथ शिंदे सह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना भोजनाच्या निमंत्रण दिले
शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नमो महारोजगार मेळावा बारामती या कार्यक्रमादरम्यान शनिवारी (2 मार्च) उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीत येणार असल्याचे कळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्नेह भोजनाचे निमंत्रण दिले आहे. या स्नेहभोजन निमित्त काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बंड करत आपला एक वेगळा गट सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेला असून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांनी स्वतःकडे वळवून घेतले आहे या सगळ्या घडामोडीनंतर शरद पवारांनी अजित पवार यांना स्नेहभोजनाच्या निमंत्रण दिल्याचे दिसून आले आहे. Sharad Pawar News
शरद पवार यांचे पत्र?
02 मार्च, 2024 रोजी बारामती येथे शासकीय दौ-यानिमित्त येत असल्याचे समजले सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल, तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो, करीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करतो. Sharad Pawar News
आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविदबाग ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा, असे शरद पवार यांनी पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. Sharad Pawar News