Sharad Pawar Invite To Join Bharat Jodo Nyay Yatra : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा वर्षाताई गायकवाड उपस्थितीत होते
मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी चालू केलेले भारत न्याय जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात प्रवेश केला असून आज दुपारीच राहुल गांधी यांचे नंदुरबार येथे आगमन झाले आहे. 12 ते 17 तारखेच्या दरम्यान नंदुरबार ते मुंबई असा प्रवास भारत न्याय जोडो यात्रा आहे. या यात्रेमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले सर्व पक्षांनी सहभागी व्हावे याकरिता आमंत्रित केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Shard Pawar यांना काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भारत जोडणे यात्रेचे आमंत्रण दिले. या आमंत्रणाच्या वेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांच्यासह मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाड माजी मंत्री असलम शेख आमदार अमिन पटेल प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते सचिन सावंत हे उपस्थित होते.
कशाप्रकारे मार्ग असणार आहे? (Bharat Jodo Nyay Yatra Mumbai Timing)
दुपारी 2 वाजता नंदुरबार जिल्ह्यात ते येतील. 13 मार्चला धुळे व मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्च रोजी पालघर, ठाणे व 16 मार्च रोजी मुंबईत मुक्काम होईल. 17 मार्चला शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे. या वेळी लोकसभेचे रणशिंगही फुंकले जाईल. या यात्रेचा राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या जागांवर प्रभाव पडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत. यात उत्तर महाराष्ट्रातील 4, पालघर- ठाणे- कल्याण असे 3 आणि मुंबईतील 6 जागांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेसाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण दिले आहे. प्रकाश आंबेडकरांनाही उपस्थित राहण्यासाठी गळ घातली जाणार असल्याचे समजते. तसेच नाशिक येथील येवला येथे होणा-या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत. तसेच ते या ना यात्रेतही सहभाग होणार असल्याचे सांगितले जात आहे.