महाराष्ट्रमुंबई

शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी, कोणाला दिली संधी?

Sharad Pawar Group Lok Sabha Election Second List : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. याआधी पक्षाने पाच जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

मुंबई :- शरद पवार Sharad Pawar यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Election उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीतून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले आहे. बजरंग सोनवणे यांनी नुकताच अजित पवार यांच्या गटाला जोरदार धक्का देत शरद पवार यांच्याशी हातमिळवणी केली. बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे या उमेदवार आहेत. Sharad Pawar NCP Second List 

आणखी कुणाकुणाला उमेदवारी जाहीर?

शरद पवार गटाकडून भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Sharad Pawar NCP Second List 

कोण आहेत बजरंग सोनवणे?

राष्ट्रवादीत फुट पडण्याआधी बजरंग सोनवणे Bajrang Sonawane हे जिल्हाध्यक्ष होते. 2019 साली त्यांनी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यावेळी त्यांनी पाच लाखांपेक्षा अधिक मतेही घेतली होती. परंतू पराभव झाल्यानंतर ते फारसे सक्रीय झाले नाहीत. त्यातच त्यांचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आले.

त्यामुळे ते केज वगळता फारसे जिल्ह्यात सक्रीय दिसले नाहीत. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी झाल्या. त्यात बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्यासोबत राहिले. परंतू इकडे त्यांची घुसमट होत असल्याने ते नाराज होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चाही झाली. Sharad Pawar NCP Second List 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0