क्राईम न्यूजमुंबई

Fake Certificate Racket : मुंबई पोलीसाच्या गुन्हे शाखा -6 कामगिरी ; बनावट कागदपत्र सादर करून जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Crime News Mumbai Police Busted Fake Certificate Racket : बनावट कागदपत्रे तयार करून तोतया जामिनदार न्यायालयांमध्ये हजर करून अटकेतील आरोपीना नामिन करून देणाऱ्या टोळीविरूध्द मुंबई गुन्हे शाखेने कारवाई

मुंबई :- जामीन मिळवण्यासाठी कागदपत्र सादर करून न्यायालयाचे फसवणूक करणाऱ्या टोळी विरुद्ध पोलिसांनी केली आहे.(03 एप्रिल) रोजी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ६श6 कार्यालयास, “महात्मा फुले नगर, मानखुर्द, मुंबई या ठिकाणी काही इसम हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई व इतर जिल्हयांमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हयांतील अटक आरोपींचे जामीनाकरीता लागणारे वेगवेगळ्या नावाचे जामीनदारांचे बनावट कागदपत्रे उदा. आधार कार्ड, वेतन स्लीप, बैंक स्टेटमेंट, रेशन कार्ड इ. कागदपत्रे लॅपटॉपवर तयार करून यावर विविध शासकीय व खाजगी कार्यालयांचे बनावट रबरी स्टैंप मारून तयार केलेल्या बनावट कागदपत्रांसह तोतया जामिनदारास न्यायालयांमध्ये उभे करून अटकेतील आरोपींना जामिन करून देतात.” अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. Mumbai Crime News

बातमीचा पाठपुरावा करून 3 एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीची सर्वांगीण शहानिशा करून नियोजनपूर्व मुंबई गुन्हे शाखा, कक्ष 6 कार्यालयातील पोलीस पथकाने महात्मा फुले नगर, मानखुर्द, मुंबई या ठिकाणी छापा टाकून घटनास्थळावरून आरोपी नामे 1) अमित नारायण गिजे, (44 वर्षे) 2) बंडू वामन कोरडे, (44 वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून लागलीच विविध पथके तयार करून नियोजनपूर्वक 3) अहमद कासिम शेख, (44 वर्षे) यास छेडा नगर, मुंबई येथून तसेच 4) संजीव सोहनलाल गुप्ता, (34 वर्षे), यास भिवंडी, जि. ठाणे येथून व (1) उमेश अर्जुन कावले, (48 वर्षे) यास कल्याण, जि. ठाणे येथून असे एकूण 5 आरोपींना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, वेगवेगळया कंपन्यांचे ओळखपत्रे, पॅनकार्ड, महानगर पालिकेच्या कर पावत्या, एक लॅपटॉप, एक मल्टीपल प्रिंटर, एक मिनी लॅमिनेटर, एकाच इसमाचे वेगवेगळया नावांनी तयार केलेली आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बैंक स्टेमेंट, सॉलव्हनसी, विविध कंपन्यांची ओळखपत्रे इत्यादी बनावट कागदपत्रे हस्तगत केली आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीविरूध्द मानखुर्द पोलीस ठाणे, मुंबई गुन्हा कलम 420,465,467,468,471,473,474,475,476,120 (ब) भादंविसं अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा, कक्ष 6 करीत आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar , विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व), चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक पवार, पोलीस निरीक्षक ननावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, पोलीस उपनिरीक्षक मुठे, पोलीस उपनिरीक्षक रहाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, पोलीस उपनिरीक्षक बेळणेकर,सावंत,सकपाळ,आव्हाड, सहाय्यक फौजदार कुरडे, देसाई, पोलीस हवालदार पारकर, तुपे, वानखेडे, शिंदे, गायकवाड, मोरे, पोलीस शिपाई घेरडे, माळवेकर, कोळेकर, महिला पोलीस शिपाई अभंग, पोलीस शिपाई पवार, महिला पोलीस शिपाई सुतार, पोलीस हवालदार डाळे, आणि पाटील यांचे पथकाने पार पाडली आहे. Mumbai Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0