Vasai Crime News : तडीपार असूनही जबरी चोरी! पोलिसांच्या जाळ्यात ‘कलप्या’ अखेर सापडला

•वसई गुन्हे शाखेची शक्कल फळाला – 12 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्डधारक गजाआड
वसई | तडीपार आदेश झुगारून पुन्हा गुन्ह्याच्या मार्गावर उतरणाऱ्या कुख्यात ‘कलप्या’चा अखेर शेवट झाला! गुन्हे शाखा कक्ष-2, वसईच्या पथकाने कौशल्यपूर्ण सापळा रचून या सराईत गुन्हेगाराला अटक केली. कल्पेश ऊर्फ कलप्या किसन शिंदे (वय 24, रा. नाईकपाडा, वसई पूर्व) या आरोपीविरोधात जबरी चोरीसह तब्बल 12 गुन्हे नोंद आहेत.
गर्दीच्या वसईत खुलेआम फिरणारा तडीपार आरोपी पोलिसांच्या ‘वॉच’मध्ये अडकला
पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान भगत शाळेजवळ संशयित हालचाल लक्षात घेत तातडीने कारवाई केली. चौकशीदरम्यान आरोपीच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन उघडकीस आले. शिवाय, 30 नोव्हेंबर 2024 रोजी सातीवली येथे एका नागरिकाच्या गळ्यावर चाकू ठेवून मोबाईल हिसकावल्याचा गंभीर गुन्हाही त्याने कबूल केला.
या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा नोंद असून, या कारवाईमुळे पोलिसांना एक मोठा सासवणारा गुन्हेगार हाती लागला आहे. कलप्या याच्यावर मालमत्ता व शरीराविरुद्ध गुन्ह्यांचे डझनभर गुन्हे दाखल असून, तो वसई परिसरात पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ,पोलीस निरीक्षक समीर अहिरराव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे,पोलीस उपनिरीक्षक अजित गिते,पोलीस हवालदार रमेश भोसले,रविंद्र पवार,मुकेश पवार,प्रफुल्ल पाटील,सचिन पाटील,जगदिश गोवारी,दादा आडके,सुधीर नरळे,राहुल कर्पे, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर,पोलीस अंमलदार अनिल साबळे,प्रतिक गोडगे,राजकुमार गायकवाड,अविनाश चौधरी गुन्हे शाखा कक्ष-2 वसई मि.भा.व.वि. यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.


