Shahpur Bribe News : शहापूर : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई, लाच मागितल्या प्रकरणी खाजगी व्यक्तीला अटक,तलाठी फरार!

•फेरफार आणि सातबारा जमिनीवर नाव नोंदणी करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठी व खाजगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे, या कारवाईमध्ये तलाठी फरार झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो
शहापूर :- शेणवे गाव येथे पाच एकर जमीन खरेदी केली असून जमिनीचे फेरफार मंजूर करून सातबारा मध्ये जागा मालकाचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया करण्याकरिता तलाठी आणि खाजगी व्यक्तीमार्फत आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पालघर युनिटने कारवाई करत खाजगी व्यक्तीला आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तसेच एसीबी कडून फरार तलाठीचा शोध घेतला जात आहे. खाजगी व्यक्तीला तक्रारदार येणे दोन लाख रुपये नगद आणि उर्वरित सहा लाख रुपये नकली नोटा दिल्या आहेत. एसीबीने या प्रकरणी अशोक दत्ताराम वरकुटे (62 वय, रा. शेणवे ता. शहापूर) खाजगी व्यक्ती याला अटक केली असून तलाठी ज्ञानेश्वर देविदास सिसोदे (सजा वेहगेली युद्धक, ता. शहापुर) फरार आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकांनी सर्वे नं. 267/बी शेणवे गाव येथे पाच एकर जमिन खरेदी केली आहे. जमिनीने फेरफार मंजूर करून सात बारामध्ये जागामालकाचे नाव नोंदविणेची प्रक्रिया करण्याकरिता जागामालक यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिलेले होते.
जागामालकाचे नावे फेरफार मंजुर करुन सात बारा मध्ये नाव नोंदविण्याचा अर्ज सुमारे दहा महिन्यापासुन प्रलंबित होता. काम करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांनी वेहळोली बुद्रुक तलाठी कार्यालयात काम करणा-या खाजगी इसम अशोक दत्तात्रय वरकुरे यांच्या मार्फतीने पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली असल्याची तक्रार ला.प्र.वि, कार्यालय पालघर यांना 16 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली होती. एसीबीने पडताळणी केली असता तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांनी खाजगी व्यक्ती अशोक वरकुटे यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्या फेरफार नोंदणीच्या अर्जामध्ये त्रुटी काढून अर्ज रद्द न करता फेरफार मंजुर करण्याकरीता रुपये आठ लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे पडताळणी कार्यवाही मध्ये निष्पन्न झाले. एसीबीने सापळा रचून खाजगी व्यक्तीअशोक वरकुटे यांना तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांच्या वतीने आठ लाख रुपये (त्यामध्ये दोन लाख रुपये असली नोटा तर सहा लाख रुपये खेळण्यातल्या नकली नोटा होत्या) स्विकारतांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले आहे. दोघांच्या विरोधात किन्हवली पोलीस ठाणे, भ्रष्टाचार अधिनियम कायदा अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एसीबी पथक
संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, मुंबई अतिरिक्त कार्यभार ला.प्र.वि, ठाणे परिक्षेत्र, ठाणे अपर पोलीस अधीक्षक,गजानन राठोड, ला.प्र.वि, ठाणे परिक्षेत्र ठाणे,अपर पोलीस अधीक्षक, महेश तरडे, ला.प्र.वि, ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल चव्हाण पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्या पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.