Maharashtra BJP News : भाजपच्या राज्य परिषदेवर साताऱ्याच्या दहा दिग्गज नेत्यांची वर्णी

Maharashtra BJP Latest News : स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मजबूत संघटन उभारण्याची तयारी
मुंबई | सातारा जिल्ह्यातील दहा प्रमुख नेत्यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर करण्यात आली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. खासदार उदयनराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, सत्यजित पाटणकर, डॉ. प्रियाताई शिंदे, अविनाश कदम, भीमराव पाटील, हर्षवर्धन मोहिते, संजय पवार, आणि संतोष गावडे अशी या नियुक्त नेत्यांची नावे आहेत. Maharashtra BJP Latest News
या नियुक्त्या केवळ सन्मानपर नाहीत, तर पक्षाच्या आगामी रणनीतीत त्यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद नेमण्यात आली असून, महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्यास घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय साधणे हा तिचा प्रमुख उद्देश राहणार आहे.
दरम्यान, भाजपची नवीन राज्य कार्यकारिणीही लवकरच जाहीर होणार आहे. त्यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर महत्वाची पदे भरण्यात येणार असून, राज्य परिषदेतील सदस्यांची मते त्यासाठी विचारात घेतली जाणार आहेत. त्यामुळे या नियुक्त्या साताऱ्याच्या नेत्यांसाठी केवळ प्रतिष्ठेची नाहीत, तर पक्षातील आगामी धोरणनिर्धारणात सक्रीय सहभागाची संधी ठरणार आहेत.


