Sanjay Raut : विधानसभेला हा बांबू आरपार जाईल… संजय राऊत यांची शिंदे गटावर जोरदार टीका
•240 चे 275 कधी होईल हे मोदी आणि शाहा यांना कळणार ही नाही.. खासदार Sanjay Raut
नाशिक :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे. काही लोकांना बांबू लावायला पाहिजे, असं शिंदे म्हणाले आहेत. यावर खासदार संजय राऊत यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे.
सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो बांबू घातला आहे, तो अजून निघालेला नाही. त्यांच्या महायुतीला आम्ही बांबू घातला आहे. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू दिसतोय, इतक्या आतमध्ये तो बांबू गेला आहे, अशी कडवट टीका राऊतांनी केली.विधानसभेला हा बांबू आरपार जाईल तसेच यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही टीका केली आहे.
240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाहांना कळणारही नाही. संसदेत आता मोदी आणि शाहांचा आवाज घुमणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. नाशिकमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला. याविरोधात आम्ही एकत्रित आवाज उठवणार आहोत. संसदेत आता मोदी आणि शाहांचा आवाज चालणार नाही. तर इंडिया आघाडीच्या 240 लोकांचा आवाज चालणार आहे”, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.