मुंबई

Sanjay Raut : भाजपाने हिंदुत्वाचे कोणते दिवे लावले ; शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत गौप्यस्फोट, भाजपावर गंभीर आरोप

मुंबई ‌:- संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, “ईडी ED आणि सीबीआय CBI मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होते. तुरूंगात जायचे नाही म्हणून एकनाथ शिंदे कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा ना. स्वतः एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून पळाले. भाजपमध्ये एकतर भ्रष्टाचाऱ्यांना स्थान आहे किंवा खोट बोलणाऱ्यांना जागा आहे. एखादा माणूस भाजपमध्ये गेला की, त्याला खोटं बोलण्याचे ट्रेनिंग दिले जाते”, असे राऊतांनी म्हंटले आहे.असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मोदी आता देशाचे नव्हे तर भाजपचे नेते झाले आहेत असेही त्यांनी म्हंटले आहे. Sanjay Raut Latest News

पुढे राऊतांनी ठाकरे गटाच्या गीतावरून निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसवर भाष्य केले आहे. राऊतांनी भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये जय भवानी, हरहर महादेव या घोषणा दिल्या जातात. या घोषणेवर आजपर्यंत कोणीही बंदी आणली नाही. तुमचे नमो नमो चालते पण आमचे जय भवानी चालत नाही. हे कसले तुमचे हिंदुत्ववादी सरकार? हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही असे फडणवीस म्हणतात मात्र त्यांनी हिंदुत्वाचे कोणते दिवे लावले? असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. Sanjay Raut Latest News

मोदींना पराभवाची भीती हे स्पष्ट राऊतांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले, “मोदी आता देशाचे पंतप्रधान राहिलेले नाहीत. ते भाजपचे नेते झालेले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणीही देशाचे पंतप्रधान नसते. मोदी भाषणात राष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य करत नाहीत. मोदींनी मुस्लिमांबद्दल केलेल्या विधानावरून हे स्पष्ट होते की मोदींना पराभवाची भीती आहे”, असे राऊत म्हणाले. Sanjay Raut Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0