मुंबई

Sanjay Raut : जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला

Sanjay Raut Target Amit Shah For  terror attacks in Jammu and Kashmir’s: अमित शहा हे सर्वात अपयशी गृहमंत्री, संजय राऊत यांचे टीका

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित शहा हे सर्वात अपयशी गृहमंत्री असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच अमिषा दुसऱ्यांना गृहमंत्री झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले वाढल्याने देशातील कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासूनच धोका असल्याचे टीका संजय राऊत यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसात तीन दहशतवादी हल्ले झाले आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बस वर हल्ला करत दहा भाविकांचा मृत्यू झाला आहे ही घटनाच ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या डोळा जिल्ह्यातील लष्कर तळावर गोळीबार केला यामध्ये काही जवान जखमी झाले आहे. सततच्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाले आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री हे अपयशी गृहमंत्री असल्याचे टीका संजय राऊत त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

कोकण पदवीधर मतदार संघातून शिवसेनेना ठाकरे यांची माघार,तर नाशिक मधून काँग्रेसचे माघार

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊतांनी नाना पटोले यांना टोला लगावला. ते म्हणाले, “नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत. आमची अपेक्षा आहे की, ते आणखी मोठे नेते व्हावेत. चार विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत. त्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ 40 वर्ष शिवसेना ठाकरे गट जिंकत आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे चर्चेचा विषय येत नाही. नाशिकच्या जागेबाबत तशी चर्चा करण्याची गरज नव्हती. आता कोकणची जागा काँग्रेसला देण्यात येत आहे. यासंदर्भात आमची चर्चा झाली असून यामध्ये नाना पटोलेही होते. आम्ही कोकणातील उमेदवारी माघारी घेत आहोत आणि काँग्रेस नाशिकची उमेदवारी माघारी घेईल”, असं संजय राऊ यांनी स्पष्ट केलं

Web Title : Sanjay Raut: Speaking on the terrorist attacks in Jammu and Kashmir, Sanjay Raut strongly attacked Union Home Minister Amit Shah.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0