मुंबई

Sanjay Raut : विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवार निवडून आलो संजय राऊत यांना विश्वास

Sanjay Raut News : मोदी-शहांचा अहंकार संसदेत चुर करण्याचे काम राहुल गांधी हे करत आहे

मुंबई :- विधान परिषदेच्या Vidhan Parishad 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी मोठा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले की,विधान परिषद निवडणुकीत आम्ही मविआचे तिन्ही उमेदवार निवडून आणू, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर भाजपला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान कमी पडत आहे, असे म्हणत भाजपची विधान परिषदेची जागा धोक्यात असल्याचे सूचक विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींचा लगाम आहे, असे म्हणत राऊतांनी भाजपसह पीएम मोदींवर टीकास्त्र डागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला व दुसऱ्या बाजूला ‘एक अकेला’ राहुल गांधी या सगळय़ांवर भारी पडले. मोदी-शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचे काम गांधी यांनी केले, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याला बालबुद्धी म्हणणे यातून आपली संस्कृती दिसते, असा टोला राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. त्याच नेत्याने तुम्हाला घाम फोडला असेही त्यांनी म्हटले आहे. तुम्ही संविधान, संसदीसय लोकशाही मानायला तयार नाही म्हणून आम्ही संविधान संकटात आहे असे म्हणतोय असे स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावलय. 400 पार बोलत होते, ते जेमतेम 200 पार झालेत. त्याला जबाबदार राहुल गांधी आहेत. तेच राहुल गांधी त्यांच्यासमोर लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावं. त्यांच्या हुकूमशाही, एकाधिकारशाही यावर राहुल गांधींचा लगाम येणार आहे” असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “विरोधी पक्ष नेता, ज्याला घटनात्मक, संविधानिक दर्जा आहे, त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील, तो त्यांचा अपमान नसून संविधानिक पदाचा अपमान आहे. म्हणून आम्ही संविधान खतरे में आहे असं म्हणत आहोत.भाजपाने कशा प्रकारे निवडणूक लढवली, लोकसभेच्या काही जागा कशा चोरल्या हे सांगत असताना माझा माईक बंद केला असे संजय राऊत म्हणाले. मला खर बोलायच होतं, हे आपातकाल, आणीबाणी विषयी सतत बोलत असतात, ते सत्य मला सांगायच होतं. हे त्यांना समजल्यामुळे त्यांनी माझा माईक बंद केला असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही 50 वर्षापूर्वीची आणीबाणी विसरुन भविष्यकाळाकडे पाहिलं पाहिजे.

राऊतांनी ट्विट करत साधला निशाणा

संजय राऊत म्हणाले की, मी सत्य बोलत होतो आणि चमचे नाराज झाले. नंतर माझा माईक बंद करण्यात आला. म्हणूनच मी सांगतो की, राज्य घटना धोक्यात आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0