मुंबई

Sanjay Raut On Shrikant Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका

•Sanjay Raut Speaks On Shrikant Shinde श्रीकांत शिंदे अजूनही बच्चा आहे

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्ला करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.श्रीकांत शिंदे अद्याप बच्चा आहे. बच्चाजीमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही नारायण राणे यांचा देखील पराभव केला आहे. अनेक मोठमोठे लोक महाराष्ट्रात पडले आहेत. श्रीकांत शिंदे यांचा पराभव देखील वैशाली दरेकर या करतील, असे म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे यांना कल्याण- डोंबिवली मध्ये खासदारकी ही उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, आता तुमच्या युतीने अद्याप तुमची उमेदवारी जाहीर केली नसल्याचे ते म्हणाले. एक सर्वसामान्य शिवसैनिकच तुमचा पराभव करेल, असे म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. Sanjay Raut On Shrikant Shinde

आधी तुमची उमेदवारी जाहीर करा, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा करता बच्चम जी…दिल्ली अभी दूर है… आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही. आमची सामान्य कार्यकर्ता वैशाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. Sanjay Raut On Shrikant Shinde

खासदार संजय राऊत यांनी संजय निरुपम यांच्यावरही हल्ला चढवला. संजय निरुपम यांची अकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारची कारवाई होत असते. शिवसेनेत देखील अशा प्रकारची कारवाई होते, असे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील कोणताही बंडखोर आणि गद्दार टिकणार नसल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut On Shrikant Shinde

एकेकाळी युतीत असलेले उद्धव ठाकरे गट आणि भाजप आता एकमेकांवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. तमाशातील नाच्यांवर बोलण्यात काही अर्थ नाही, नरेंद्र मोदी यांची अवस्था ही 2024 च्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावे, असा टोला त्यांनी हाणला. Sanjay Raut On Shrikant Shinde

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0