Sanjay Raut : क्रॉस व्होटिंगला न्यायव्यवस्था जबाबदार खासदार संजय राऊत त्यांचा आरोप
Sanjay Raut Attacks Pm Narendra Modi Bjp Government Over Cross Voting Hearing : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळाले, न्यायालयाचे तारीख पे तारीख… खासदार संजय राऊत
मुंबई :- विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये Vidhan Parishad Election महाविकास आघाडी जामदारांकडून क्रॉस व्होटिंग झाल्याचा Cross Voting आरोप अनेकांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत क्रॉस वोटिंग च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाला लक्ष करत तारीख पे तारीख देणाऱ्या संविधानाची हत्या के होत आहे असा हल्लाबोल संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे. भाजपा सह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
उच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्ह बाबतचे सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे तसेच क्रॉस वोटिंग यांसारख्या मुद्द्यावर संजय राऊत आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “तारीख पे तारीख.. 14 जुलैला होणारी सुनावणी 14 ऑगस्टवर गेली. यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळते. खरं म्हणजे देशातील घटनाबाह्य सरकार रोखण्याचे काम न्यायव्यवस्था आणि संविधानाचे आहे. पण आपले न्यायलय ही नरेंद्र मोदी अन् अमित शहांच्या दबावाखाली काम करतात का? अशी लोकांना शंका येऊ लागली आहे”, अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे. Sanjay Raut Attacks Pm Narendra Modi Bjp Government Over Cross Voting Hearing
संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे दरम्यान नुकतेच केंद्र सरकारकडून संविधान हत्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरूनही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “केंद्र सरकार संविधान हत्या दिन साजरा करणार आहे. मात्र महाराष्ट्रातील सरकार चालवणं हीच संविधानाची हत्या आहे. मोदी- शहांना संविधानाची चिंता असेल तर त्यांचा पक्ष तसं काम करतोय का? संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे, मात्र आम्हाला तारखा दिल्या जात आहेत. ही तारीख म्हणजेच संविधानाची हत्या आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.
क्रॉस व्होटिंगला न्यायव्यवस्था जबाबदार पुढे संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये ज्याप्रकारे क्रॉस व्होटिंग झाले. त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे, पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये त्याबाबत आम्हाला तारखा दिल्या जात आहेत मात्र कारवाई होत नाही. त्यामुळेच यांची भिती चेपली आहे. एका पक्षाच्या तिकीटावर निवडून यायचे आणि कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्याला मतदान करायचे”, असे राऊत म्हणाले. Sanjay Raut Attacks Pm Narendra Modi Bjp Government Over Cross Voting Hearing