Sanjay Raut : UGC-NET परीक्षा रद्द झाल्याने राजकारण तापले, संजय राऊत म्हणाले- ‘PM मोदींनी इटलीला…..’

•शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी देशातील विविध शहरांमध्ये होणारी UGC-NET 2024 रद्द केली आहे. हेराफेरीची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
मुंबई :- UGC-NET 2024 परीक्षा रद्द करण्यात आली आहे. अनियमिततेच्या भीतीने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 18 जून रोजी घेण्यात आली. आता त्याची चौकशी सीबीआय करणार आहे. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे.
संजय राऊत म्हणाले, “आपले पंतप्रधान त्यांच्या मन की बात, बोलतात आणि परीक्षांबाबतही चर्चा करतात. मात्र देशात परीक्षांच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीवर ते चर्चा करणार नाहीत. लाखो तरुणांच्या भवितव्याच्या प्रश्नावर चर्चा होईल. “पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला जाऊन बसले आहे. ते निश्चितच तिथे चर्चा करत असेल परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले तर तुम्ही विचारता तुम्ही पीएमला प्रश्न का विचारतात
संजय राऊत पुढे म्हणाले की, “आम्ही राज्यातील 31 खासदार मोदीजींच्या विरोधात पाठवून त्यांना जिंकून दिले. आमच्याकडून सर्व काही हिसकावले गेले, तरीही शिवसेनेने 9 जागा जिंकल्या.” काल शिवसेनेच्या स्थापना दिनी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. तुम्ही आमचे सर्व काही हिसकावून घेतले पण तरीही शिवसेना लढली. आमचे आव्हान आहे की, “पंतप्रधान मोदींनी ज्या व्यक्तीला आमचे निवडणूक चिन्ह दिले आहे, त्या व्यक्तीचे हि निवडणूक चिन्ह आणि नाव काढून आमच्याविरोधात थेट निवडणूक लढवावी.”
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 18 जून रोजी UGC-NET दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. एका निवेदनात शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, UGC ला गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिसिस युनिटकडून परीक्षेतील हेराफेरीची माहिती मिळाली आहे.
परीक्षा प्रक्रियेत उच्च पातळीची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने UGC-NET 2024 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुन्हा परीक्षा होणार, त्याबाबतची माहिती नंतर दिली जाईल.