क्राईम न्यूज
Trending

Gangster Tipu Pathan | पुणे पोलिसांना मोठं यश ! टिपू पठाण गँगचा मोक्यातील फरार आरोपी बागवान याला हैद्राबाद येथून अटक

  • मोक्यातील १७ आरोपींपैकी १५ अटक : २ फरार

पुणे, दि. २५ जुलै, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
| Pune Crime News, Gangster Tipu Pathan

हडपसर सय्यदनगर येथे महिलेच्या जागेवर ताबा व खंडणी प्रकरणी टिपू पठाण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्का गुन्ह्यात एकूण १७ जणांना आरोपी करण्यात आले होते. यातील टिपू पठाण याला पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. तर यातील फरार आरोपी फयाज बागवान याला गुन्हे शाखेकडून हैद्राबाद येथून अटक करण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट -५ पोलीस अंमलदार नासेर देशमुख व राहुल ढमढेरे यांना फरार आरोपी फय्याज गफार बागवान हा प्रेमनगर, हाफिसपेठ, हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखा युनिट-५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी फय्याज बागवान याला हैद्राबाद येथून अटक केली. Pune Crime News, Gangster Tipu Pathan

यापूर्वी पुणे पोलिसांनी 1. रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण (३४) 2. एजाज सत्तार पठाण (३९) 3. नदीम बाबर खान (४१) 4. सद्दाम सलीम पठाण (२९) 5. एजाज युसूफ इनामदार-पटेल (३३) 6. इरफान नासीर शेख (२६) 7. साजिद नदाफ (२६) सह १५ आरोपीना अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0