महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांनी “त्या” कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगितले आहे

Sanjay Gaikwad Fighting Video Get Viral – आमदार संजय गायकवाड यांचा तरुणाला मारहाण करण्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

बुलढाणा :- शिवजयंती कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो. त्यामुळे बहुसंख्य महिला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांची सुरक्षा करणे माझे आद्यकर्तव्य होते. ‘मी पोलिसांची वाट पाहिली असती, पण तोपर्यंत उशीर झाला असता.शिवजयंती मिरवणुकीत आपण ‘त्या’ युवकास केलेल्या मारहाणीचा, आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी म्हटले आहे. आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती.

मात्र, पोलिसांना मिरवणुकीत ते गवसले नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले. त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली. माताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते. यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह बाब आहे. यापुढेही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच असे ते ठासून म्हणाले आहे.

आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनीही काही दिवसांपूर्वीच आपण एका वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात बांधल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0