सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, सांगलीत महाविकास आघाडीवर संकट
Vishal Patil Sangli Lok sabha Election 2024 : विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन
सांगली :- राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाकरे गटाकडून Thackeray Group सांगलीत चंद्रहार पाटलांची Chandrahar Patil उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीची लाट पसरली होती. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलाच मिठाचा खडा पडला होता. Vishal Patil Sangli Lok sabha Election 2024
विशाल पाटील यांच्याकडून मोठं शक्तिप्रदर्शन विशेष म्हणजे, विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आज विशाल पाटील यांच्याकडून सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन देखील केले जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Vishal Patil Sangli Lok sabha Election 2024
सांगलीच्या जागेवरून ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काल विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणा आहेत.विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्र लिहले. तसेच रक्ताने लिहलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले. दरम्यान, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्याच्या मुलगा खासदार होतोय हे दुखणं असेल तर काँग्रेसने तसं उघडपणे सांगावे असे चंद्रहार पाटील म्हणालेत. एकूणच सांगलीमध्ये राजकीय खळबळ मजल्याचे पाहायला मिळत आहे. Vishal Patil Sangli Lok sabha Election 2024