छ.संभाजी नगर

Sambhaji Nagar Lok Sabha : छत्रपती संभाजी नगर मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती दोन गटांमध्ये शाब्दिक राडा

Sambhaji Nagar Lok Sabha : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भर चौकात रॅलीमध्ये दारूच्या बाटल्या हातात घेऊन विरोधकांना डीवचले

छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आमने सामने आल्यानंतर वाद निर्माण झाला होता.क्रांती चौकात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी हातात दारुची बाटली धरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेंकांवर धावून जाताना पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांनी हातात नोटा धरुन मनसेला डिवचलं. यावर मनसेकडून देखील उत्तर देण्यात आलं.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महायुती आणि महाआघाडीच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही रॅली क्रांती चौकातून सुरू होणार होत्या. महाआघाडीच्या वतीने प्रचारालीसाठी सकाळची वेळ घेण्यात आली होती. मात्र, कार्यकर्ते उशिरापर्यंत दाखल झाले नाहीत. तोपर्यंत महायुतीचे कार्यकर्ते क्रांती चौकात दाखल झाले. त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यामुळे हा सदरील प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही वेळातच महायुती आणि महाआघाडीचे सर्व वरिष्ठ नेते देखील घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ नेते दाखल झाल्यानंतरही येथील तणाव लवकर निवळला नाही. Sambhaji Nagar Lok Sabha Live News

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पन्नास खोके आणि एकदम ओके अशा घोषणा दिल्या. अंबादास दानवे यांनी भुमरे यांचा व्यवसाय दारुचा आहे त्यामुळं दारुची बाटली दाखवतोय, असं म्हटलं. पैठणची दारु संभाजीनगरमध्ये आणायची का असा सवाल दानवे यांनी केला. तणाव योग्य नाही पण आमच्या कार्यकर्त्यावर हात उचलला तर आम्ही देखील उत्तर देऊ असं अंबादास दानवे म्हणाले. संदिपान भुमरे यांचा व्यवसाय दारु असल्याचं लोकांना सांगतोय, असं अंबादास दानवे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवू ,असं अंबादास दानवे म्हणाले. तर, ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसल्यानं असा प्रकार करण्यात आला, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. Sambhaji Nagar Lok Sabha Live News

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत, शिवसेनेकडून संदिपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील लोकसभेच्या रिंगणात आहेत.

Watch Video : – https://www.facebook.com/share/r/1BWBNL7diS15zD2U/?mibextid=qi2Omg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0