Salman Khan House Shoot Update : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहावा आरोपी हरियाणातून पकडला गेला
•मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरपाल सिंगला फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी हरपालनेच या प्रकरणातील अन्य आरोपी मोहम्मद रफिकला पैसे दिले होता आणि त्याला रेकी करण्यास सांगितले होते.
ANI :- अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने हरियाणातील फतेहाबाद येथून सहाव्या आरोपीला अटक केली आहे. हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हरपालने आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्यास सांगितले होते.
14 एप्रिल रोजी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. या प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत विकी गुप्ता, सागर पाल, अनुज थापन, सोनू बिश्नोई, रफिक चौधरी यांना अटक केली आहे. अटकेनंतर अनुज थापनने पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. अनुज थापनचे कुटुंबीयही या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.
याआधी मुंबई क्राईम ब्रँचने 5वा आरोपी मोहम्मद रफिक याला पंजाबमधून अटक केली होती. चौधरीने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोघांनाही पैसे दिले होते आणि सलमानच्या घराची रेकी करायला सांगितले होते. आता सहाव्या आरोपीला अटक केल्यानंतर हरपाल सिंगने रफिकला पैसे देऊन हे काम करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे.
तपासाअंती मुंबई क्राइम ब्रँचने सांगितले होते की, सलमान खानच्या घराबाहेर 7 राउंड गोळीबार झाला. गोळीबारापूर्वी आरोपींनी सलमानच्या घराची तीनदा फेरफटका मारल्याची कबुली चौकशीत आरोपींनी दिली आहे.