Sahil Khan Arrested : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. या अभिनेत्याला छत्तीसगडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे
मुंबई :- अभिनेता साहिल खानबाबत Sahil Khan Arrested एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता अडचणीत आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने त्याला ताब्यात घेतले आहे. खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती. या अभिनेत्याने जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
आता महादेव बेटिंग ॲप Sahil Khan Arrested प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. या अभिनेत्याला छत्तीसगडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.
या अभिनेत्यावर लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना बोलावून भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील आणखी अनेक महत्त्वाचे मुद्दे पोलिस समोर आणू शकतात.
गुन्हा व कलम (सी.सी.टी.एन.एस. क्र. ६२/२३) कलम ४२०,४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), भादवि सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम चे कलम १२ (अ) सह कलम ६६ (डी), ६६ (एफ) माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० ( माटुंगा पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र. ४७३/२३)

पोलीस पथक
विशेष तपास पथक, गुन्हे शाखा, मुंबई च्या पथकाने पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त, श्देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे,पोलीस उप आयुक्त (डी-१) विशाल ठाकुर, पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, सायबर पोलीस ठाणे, मध्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक अरूण थोरात, पोलीस निरीक्षक प्रविण मोहीते, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, पोलीस हवालदार अशोक शिंदे, पोलीस हवालदार सचिन ननावरे, पोलीस शिपाई मयुर थोरात, सहाय्यक फौजदार पासी, पोलीस हवालदार जगदाळे, पोलीस हवालदार शुक्ला यांनी पार पाडली आहे.