पुणे
Trending

Rupali Chakankar : “महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरील आरोपांचा प्रतिघात!”

Trupti Desai : तृप्ती देसाई व पीडित तरुणीवर गुन्हा दाखल; आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप

पुणे | महिला वकिलांमध्ये गाजलेला लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर Rupali Chakankar यांच्यावर आर्थिक मागणीचे आरोप पत्रकार परिषदेत केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई Trupti Desai आणि संबंधित पीडित तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात राज्य महिला आयोगाच्यावतीने ही तक्रार नोंदवण्यात आली असून आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रकरणाचे मूळ 2020 सालात घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. कडेगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या बहाण्याने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने त्याविरोधात पोलिसांत तक्रारही केली होती.

या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सह्याद्री अतिथीगृहात बोलावून पैशांची मागणी केल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि पीडितेने पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, यासंदर्भात कोणतीही लिखित तक्रार, पुरावा अथवा अधिकृत निवेदन न करता थेट प्रसारमाध्यमांपुढे आरोप केल्यामुळे आयोगाची आणि अध्यक्षांची बदनामी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राज्य महिला आयोगाच्या सचिव पद्यश्री बनाडे यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार, देसाई आणि पीडित तरुणीने आयोगाच्या प्रतिमेला ठपका आणण्याचा प्रयत्न केला असून, त्या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0