मुंबई

Malegaon News : मालेगाव भूखंड अदलाबदल प्रकरणात मोठा झटका!

•प्रांताधिकाऱ्याचे निलंबन, आठ अधिकारी आणि मुद्रांक विक्रेत्यांवर चौकशीचा धडाका

मुंबई | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील संगमेश्वर-गुळगाव परिसरातील जमिनींच्या अदलाबदल प्रकरणात मोठे घोटाळे उघड झाले असून, या प्रकरणात तुकडाबंदी कायद्याचे तसेच एमआरटीपी कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर कारवाई करताना तत्कालीन प्रांताधिकारी यांना निलंबित करण्यात आले असून, दोषींवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केले.

विधायक गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत या प्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, 2013 ते 2019 या कालावधीत तब्बल 258 भूखंड अदलाबदलीचे दस्त नोंदवले गेले, जे तुकडाबंदी व नगररचना कायद्याच्या अटींचे उल्लंघन करत होते.

या संपूर्ण व्यवहारांमध्ये त्या कालावधीत कार्यरत आठ महसूल अधिकारी आणि दोन मुद्रांक विक्रेते यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भातील निर्णयाचे पुनरावलोकन करताना मालेगावचे उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांनी पूर्वीचा आदेश रद्द केला आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की,चुकीच्या कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार असून एक महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0