महाराष्ट्र
Trending

RPF Leader Murder : आरपीआय नेत्याची हत्या करून फरार असलेल्या आरोपीला 16 वर्षानंतर अटक

Mira Bhayandar Police Arrested RPF Murder : मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ; 16 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेश मधून अटक

नालासोपारा :- आरपीआय नेत्याची गोळी RPF Leader Murder झाडून हत्या केलेल्या गुन्ह्यात तब्बल 16 वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी Crime Branch अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोळा वर्षांपूर्वी आरपीआय कार्यालयाच्या बाहेर गोळीबार

19 जानेवारी 2009 रोजी आचोळे गावातील आरपीआय युवा कार्यालयात, लालचंद जैस्वाल, युवा नेता प्रवीण धुळे व इतर पदाधिकारी कार्यालयात बसले होते. त्यावेळी चारचाकी गाडीमधून आलेल्या आरोपींनी प्रवीणला कार्यालयातून बाहेर बोलावून हाताने, दगडाने, विटाने मारहाण केली होती. प्रवीणला वाचविण्यासाठी जैस्वाल यालाही मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी सिकंदर शेख, अनिल सिंग या दोघांनी त्यांच्या जवळील पिस्तूलमधून प्रवीणच्या पोटावर, गळ्यावर गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी 302,144,147,148,149,323,120 (ब‌) आर्म्स ऍक्ट 3,25(1)(क), 24(3)अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 3(2),(5) कायदयानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ काही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. परंतू आरोपी झुरी उर्फ विनोद सिंग हा गुन्हा झाल्यापासून पोलिसांना मिळून येत नव्हता.

अतिशय गंभीर गुन्ह्यातील आरोपी झुरी उर्फ विनोद सिंग सर्वोतोपरी शोध घेऊन देखील तो गेल्या 16 वर्षापासून मिळून येत नव्हता. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविद केंद्रे, हनुमंत सुर्यवंशी असे तपास पथक तयार केले. या पथकाने गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळवली.आरोपी हा उत्तर प्रदेश मधील जनपद भदोही या गावी राहत असल्याची माहिती मिळाली.या पथकाने मागील 2 महिन्यापासून सतत अहोरात्र मेहनत घेत तपास सुरू ठेवला. पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने तेथे सापळा रचला. आरोपी तेथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीला ट्रान्झीस्ट रिमांड घेण्यासाठी न्यायालयासमोर हजर केले असता मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सोळा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबूरे च सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवतीं गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सूर्यवंशी, संग्राम गायकवाड, राजाराम काळे, संतोष मदने, सतिष जगताप, राजविर संधु, प्रविणराज पवार, महेश वेल्हे, अनिल नागरे, पोशि. अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, मसुब सचीन चौधरी, सफी, संतोष चव्हाण सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0