Rajendra Mhaske Resign : भाजप बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश
Rajendra Mhaske Resign। भाजप बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा पक्षाला रामराम शरद पवार गटात प्रवेश परळी विधानसभा मतदार संघातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता
मुंबई :- बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के Rajendra Mhaske Resign यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) रोजी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांना चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. आज (22 ऑक्टोबर) रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात Join Sharad Pawar Party सामील झाले. त्यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राजेंद्र मस्के मागील दहा वर्षांपासून विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही पक्षाने पहिले यादीत संधी न दिल्याने हीच नाराजी घेऊन त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे त्यांनी म्हटलं होते. पंकजा मुंडे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिक काम करूनही पक्षश्रेष्ठींकडून आरोप करण्यात आले तसेच बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान खुद्द प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत शब्द दिला होता परंतु नाव न आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे त्यांनी म्हटले होते. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने अपुरा निधी दिल्याने अनेक कामे रखडल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे विरुद्ध राजेंद्र मस्के असं सामना पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेंद्र मस्के यांनी बजरंग आप्पा सोनवणे यांचे उदाहरण देत एका शेतकऱ्याचा मुलगा जर देशाच्या राजकारणात जाऊ शकतो त्याचप्रमाणे मीही एक शेतकऱ्याचा मुलगा असून मलाही विधानसभेला निवडणुकीत संधी मिळून विधानसभेत जाण्याच्या तयारीला लागले आहे. तसेच भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.