Rohit Pawar : हीच का मोदी सरकारची गॅरंटी… आमदार रोहित पवार
•आमदार Rohit Pawar यांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे बिल ट्विट करत सरकारवर केली टीका
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवारांनी एका शेतकऱ्याचे बिल ट्विट करत मोदी सरकारना प्रश्न विचारला आहे. हेच का मोदी सरकारची गॅरंटी. या ट्विटमध्ये आमदार रोहित पवारांनी 4067 रुपयाचे औषध खरेदी त्यावर 732 बत्तीस रुपयाचा जीएसटी कर आकारण्यात आला आहे यावर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित करत हीच का मोदी सरकारची गॅरंटी आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारने आपल्या जाहिरातीमध्ये मोदी की गॅरंटी असा प्रचार सुरू केला आहे त्यावर रोहित पवार यांनी शेतकऱ्याला बिल ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.
आमदार रोहित पवारांचे ट्विट
शेतकऱ्याची 4067 रुपयाची औषध खरेदी त्यावर मोदी साहेबांचा 732 रुपयाचा जीएसटी, ही आहे मोदी सरकारची गॅरंटी….
हेच का तुमचे अच्छे दिन ? यासाठीच मोदी साहेबांमध्ये अजित दादांना विकासपुरुष ,शिंदे साहेबांना विश्वगुरु, फडणवीस साहेबांना शेतकऱ्यांचे कैवारी दिसतात का ?
असो, सर्वोत्कृष्ट अंधभक्त पुरस्कार दिला तर शिंदे साहेब , देवेद्र फडणवीस साहेब ,अजित दादा अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर असतील यात कुठलीही शंका नाही .