Rohit Pawar : रोहित पवार यांचा गंभीर आरोप, स्ट्रॉंग रूम मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घुसण्याचा प्रयत्न
Rohit Pawar On BJP : निकालापूर्वीच कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या
मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वीच पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या मालिका चालू झाले आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार Rohit Pawar यांनी विद्यमान आमदार राम शिंदे यांचा दारुण पराभव केला होता. या पराभवाची पुनरावृत्ती यंदाही करणार असा चंग बांधलेले विद्यमान आमदार रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा ट्विट च्या माध्यमातून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपावर रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
रोहित पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की,भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे… पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही…
यंदाची निवडणूकीत राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना पाहायला मिळाला होता. 2019 मध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांना 50 हजार हून अधिक लीडने हरविले होते. रोहित पवार यांना एक लाख 32 हजार 824 मतदान झाले होते तर राम शिंदे यांना 43, 347 मतदान झाले होते.