Rohit Pawar : दिल्लीच्या आयकर विभागाला लागलेला आगेवर रोहित पवार यांनी व्यक्त केली शंका
Rohit Pawar On Delhi Income Tax Fire : आयकर विभागाच्या दिल्ली येथील कार्यालयाला लागलेल्या आगीत एक अधिकाऱ्याचा मृत्यू..
मुंबई :- दिल्ली येथील आयकर विभागाच्या Delhi Income Tax Fire कार्यालयात मंगळवारी दुपारी अचानक आग लागली या गीत आयकर विभागाच्या कार्यालयातील संपूर्ण फाईल्स कम्प्युटर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी शंका व्यक्त केली आहे. रोहित पवार म्हणतात की केंद्र सरकारला सत्ता बदलीची खात्री पटल्याने कदाचित यापुढे गृह सीबीआय ईडी कार्यालयात असे आगीच्या घटना घडू शकतात अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केले आहे.
आयटीओ स्थित आयकर विभागाच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी आग लागली. या अपघातात कार्यालयीन अधीक्षक सतेंद्र कुमार (46) Satish Kumar यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर आगीत अडकलेल्या दोन महिलांसह सहा जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन विभागाच्या 16 गाड्यांनी अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तिसऱ्या मजल्यावरील तीन कार्यालयांना ही आग लागली. या दुर्घटनेत सर्व फाईल्स, कॉम्प्युटर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किट झाल्याचे समोर आले असले तरी पोलीस यामागील कारणांचा शोध घेत आहेत.
आमदार रोहित पवार यांचे ट्विट
काल दिल्लीत आयकर विभागाच्या बिल्डींगला लागलेल्या Delhi Income Tax Fire आगीत एका कर्मचाऱ्याचं निधन झाल्याची घटना दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला सत्ता बदलाची खात्री पटली असल्याने यानंतर कदाचित गृह विभागाच्या कार्यालयात, सीबीआय आणि ईडीच्या कार्यालयांमध्येही ED आगीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. तसंच या परिसरांमध्ये अग्नीशमन दलांची कुमकही वाढवायला हवी. Rohit Pawar On Delhi Income Tax Fire