Daund News : विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मागणी
दौंड, ता. २ पंजाबराव देशमुख निर्वाह शिष्यवृत्ती भत्ता मागील वर्षापासून प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांच्या चालू वर्षीचा नियोजित शिष्यवृत्ती भत्ता २०,००० हजार रुपये असून तो केवळ ९०० ते १८०० रुपये दाखवत आहे. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देखील जमा झालेली नाही. Daund News
बारामती शहरामध्ये एका लाखाच्या वरती विद्यार्थी संख्या आहे. यातील बहुतांश विद्यार्थी गावाकडून शिक्षणासाठी शहरांमध्ये आलेली आहेत. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य होते परंतु गेल्यावर्षी पासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असून विद्यार्थी प्रतिनिधी प्रितम गुळूमकर याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रलंबित शिष्यवृत्ती लवकरात लवकर जमा व्हावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. या मागणीचे पत्र बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन शेठ सातव यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी प्रेम चव्हाण, अजय पोमणे, ओम पोदार आदी उपस्थित होते. Daund News