Republic Day History : प्रजासत्ताक दिन,26 जानेवारीचा इतिहास
76th Republic Day : 26 जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हा दिवस देशभरात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.
मुंबई :- भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. Republic Day याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी स्वीकारले आहे.यंदा 2025 साली आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. देशभरात हा दिन का साजरा केला जातो? तो केंव्हापासून साजरा करणे सुरू झाले? प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व काय? प्रजासत्ताक दिनाचा इतिहास काय?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते. दीडशे वर्षांच्या संघर्षानंतर भारतातील इंग्रजांच्या राजवटीचा अंत झाला होता. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेली राज्यव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती. स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राज्यव्यवस्था स्थापन करण्यासाठी ‘संविधान सभे’ची स्थापना केली. देशासाठी संविधान तयार करण्याचे काम या संविधान सभेचे होते.
29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला आणि 2 वर्ष,11 महिने आणि 18 दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.
भारत हा देश विविध भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या संस्कृती तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत. तरीही भारतातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकत्र राहून देशाचा विकास कसा होईल यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यामुळे भारत देशाला विविधतेतील एकदा असणार देश संबोधिले जाते.2025 साली आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते.
भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो