RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेचा रेपो दर स्थिर; गृह आणि वाहन कर्जदारांना दिलासा नाही

•द्वैमासिक पतधोरण जाहीर; रेपो दर 5.5 टक्के कायम
ANI:- भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 5.5 टक्के कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेतलेल्यांना तात्पुरता कोणताही दिलासा मिळणार नाही.
गेले दोन दिवस रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर आणि संचालकांची बैठक सुरू होती. यापूर्वी सलग दोन पतधोरणांमध्ये रेपो दरात कपात करण्यात आल्याने यावेळीही दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले.
रेपो दर कायम राहिल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात किंवा मासिक हप्त्यात (EMI) कोणताही बदल होणार नाही. यापूर्वी रेपो दर कमी झाल्यानंतर काही बँकांनी कर्जाचे व्याजदर घटवले होते, मात्र त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा झाला, हे स्पष्ट झाले नाही. या निर्णयामुळे सध्या तरी कर्जदारांना आहे त्याच दराने हप्ते भरावे लागतील.



