Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन प्रकरणात उद्धव गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि पत्नीला दिलासा, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चिट
•जोगेश्वरी जमीन प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे खासदार रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी आणि निकटवर्तीयांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जोगेश्वरी जमीन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि जवळच्या चार सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. केस बंद करण्याचे कारण देताना EOW ने म्हटले आहे की BMC ने दाखल केलेली तक्रार ‘अपूर्ण माहिती आणि गैरसमजावर’ आधारित होती.
मुंबई येथील जोगेश्वरी येथील एका भूखंडी खरेदी व्यवहारात गैर व्यवहार झाल्याचे आरोप करून या प्रकरणी रवींद्र वायकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा व त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ईओडब्लु कोर्टात शुक्रवारी सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या प्रलकरणी गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच या प्रकरणी वायकर यांच्यावर असलेले सर्व गुन्हे देखील मागे घेण्यात आले आहे.