मुंबई

Ravindra Waikar यांना शपथ घेण्यापासून रोखले पाहिजे, निवडणूक घोटाळा ; खासदार Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

•वायकरांच्या विजयाच्या घोटाळ्यात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात Sanjay Raut यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर रोष

मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार Ravindra Waikar आणि ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा संघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या हाय व्होल्टेज निकाल निर्णयाचा ड्रामा नंतर पुन्हा एकदा नव्यावादाला सुरुवात झाली आहे. ईव्हीएम हॅक झाले होते असा थेट आरोप अमोल कीर्तीकर यांनी आणि अपक्ष उमेदवार यांनी केले होते. कारण निकालाच्या मोजणी दरम्यान Ravindra Waikar यांच्या जवळच्या नातेवाईकांना मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही गंभीर आरोप केला आहे.देशातल्या निवडणूक घोटाळ्यातील हा एक आदर्श घोटाळा आहे. त्यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी पराभव दिसत होता, त्या त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी वायकर यांना निवडणूक आयोगाने शपथ घेऊ देऊ नये असे देखील म्हटले आहे.

Sanjay Raut म्हणाले की, वायकरांच्या विजयाच्या घोटाळ्यात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात आहे. सूर्यवंशी आणि त्यांच्या नातेवाईकांचे फोन ताब्यात घ्यावेत. उत्तर पश्चिम मधील निवडणूक अधिकाऱ्यांचा इतिहास तपासला पाहिजे.

वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जप्त केल्यावर वाईकरांचा जवळचा माणूस असलेला पोलिस अधिकारी वनराई पोलिस स्टेशमध्ये का येत होता? असा सवाल राऊतांनी केला आहे. रविंद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वादग्रस्त फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे मी ऐकले. पण पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बेवड्या आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! रक्तचाचणी करणाऱ्या या लॅब गृहखात्याच्या अंतर्गत येतात,

वायकरांना शपथ घेण्यापासून रोखायला हवे ; खासदार Sanjay Raut

Sanjay Raut म्हणाले की, देशात जिथे पराभव दिसत होता तिथे घोटाळे करून 45 जागांचे निकाल लावले. इव्हीएम हॅक होऊ शकते आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक करता येत, असे एलन मस्क यांनी सांगितलं आहे. लोकसभा निकाल घोटाळ्यातील उत्तर पश्चिममधील आदर्श घोटाळा आहे. संपूर्ण निकाल रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने रविंद्र वायकरांना शपथ घेण्यापासून रोखले पाहिजे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी‌ म्हटले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे Ravindra Waikar यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलिस ठाण्यातून गायब करण्यात आला, असा दावा करत त्यांनी वनराई पोलिस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, वनराई पोलिस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलिस ठाण्यातून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) निवृत्त पीआय सातारकर हे वनराई पोलिस ठाण्यात चार दिवसांपासून काय डील करत होते? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0