मुंबई

Raj Thackeray : जातीजातीमध्ये वेश निर्माण केला जातोय ; मनसे प्रमुख राज ठाकरे

Raj Thackeray Latest News : आगामी विधानसभेच्या निवडणुकीची राज ठाकरे कडून रणनीती

मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदाजे सप्टेंबर ते ऑक्टोबर यादरम्यान राज्यात विधानसभेच्या निवडणुका Vidhan Sabha Election होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. या बैठकीत लोकसभेला पक्षाची कामगिरी आणि येणाऱ्या आगामी विधानसभेच्या पक्षाची राजकीय ताकद पक्षाचे पुढील वाटचाल या संपूर्ण विषयांवर राज ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले होते. राज्यातील सर्व विधानसभेच्या बाबतचा आढावा घेतला जात आहे अशी माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिली आहे. Raj Thackeray Latest News

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्यात जातीय द्वेष निर्माण केला जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या चालू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या मुद्द्यांवर ते भाष्य करत होते. या सर्व समाजांना एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. इतकी वर्षं मी भाषणांमधून सांगत आलोय की जातीपातीतून काहीही होणार नाही. सगळे पुढारी जातीपातींमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं मिळवतील. हे लोक भोळसटपणे मतं देतीलही. काल मला कुणीतरी एक क्लिप पाठवली ज्यात लहान लहान मुलं जातींवर बोलत होती. मी फार पूर्वीच म्हणालो होतो की हे सगळं प्रकरण शाळा-कॉलेजांपर्यंत जाणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. Raj Thackeray Latest News

जातीचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे महाराष्ट्रात हे असं विष कधी नव्हतं. जातीपातींचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा आवडणारी व्यक्ती असेल तरी जर विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? काय होणार महाराष्ट्राचं? यावरून उत्तर प्रदेश-बिहारसारखाच हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होईल, असे ते म्हणाले. Raj Thackeray Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0