मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र येणाऱ्या बातमीवर राज ठाकरे यांचे खंडण

Raj Thackeray : अमित ठाकरे यांनी नरेंद्र मोदी राज ठाकरे एका व्यासपीठावर येणार आहेत असे म्हटल्याचे वृत्त एका वाहिनीने चालवले होते, त्यावर राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकीत Lok Sabha Election महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला आणि नरेंद्र मोदी Narendra Modi यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी महाराष्ट्र महायुती साठी काही दिवसात प्रचार सभा घेणार आहे. अमित ठाकरे Amit Thackeray यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर येणार आहेत असे वृत्त आहे का वाहिनीने चालवले होते. या वृत्तावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. Lok Sabha Election Update

काल (18 एप्रिल)एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली. Lok Sabha Election Update

मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही. अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळेस अमितने वरील विधान केल्याचा दावा एकाच वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केला. इतर कुठल्याच पत्रकाराने ही बातमी का नाही केली? तिथे इतरही अनेक पत्रकार होते पण कोणीच ही बातमी केली नाही, याचं कारण अमितने असं विधान केलंच नाही. Lok Sabha Election Update

अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असो.

सर्व माध्यमांनी या बातमीकडे साफ दुर्लक्ष करावं ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0