महाराष्ट्र
Trending

Rain Update: ऐन‌ हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक जिल्ह्यात मेघगर्जना

Unseasonal Rain In Maharashtra : – ठाणे-कल्याण डोंबिवली सह हिंगोली मध्ये वरूणराजा बरसले

मुंबई :- हवामान खात्याने तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला Rain Update असून काल मध्य रात्रीपासूनच हिंगोली सह ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात रिमझिम पाऊस पडला असून ऐन हिवाळ्यातच वरूणराजा बरसले आहे.आज आणि उद्या राज्याच्या विविध भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुढील दोन दिवसांत व्यक्त करण्यात आला आहे. या काळात किमान तापमान लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. Rain Update

हवामान खात्याने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (Maharashtra Orange Alert)

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. Rain Update

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान

हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये कापून टाकलेल्या गव्हाच्या पेंड्या पूर्णपणे भिजून गेले आहेत त्यामुळे गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी यासह संत्रे, मोसंबी या फळबागांना सुद्धा या पावसाचा फटका बसला आहे. Rain Update

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sanjay Raut : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पीएम नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0