Raigad Bribe News : 3 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदाराला एसीबीच्या जाळ्यात, रायगडमध्ये ACB मोठी कारवाई

Raigad Poladpur Bribe News : रायगडमधील पोलादपूर तालुक्याचे तहसीलदाराला 3 लाख रुपयांची लाचेची मागणी
रायगड :- रायगडमधील पोलादपूर तहसीलदाराला 3 लाख रुपयांची लाचेची मागणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. Raigad Poladpur Bribe News ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली. पोलादपूर तहसीलदार कपिल तुकाराम घोरपडे (39 वय) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ACB Arrested Poladpur Tahasildar त्यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या मौजे पार्टेकोंड ता. पोलादपुर, जि. रायगड येथे जमीन असून जमिनीचे तफावतीबाबत तहसिल कार्यालय, पोलादपूर येथे दावा दाखल केला होता. दाव्याचा निर्णय देवून आदेशाची प्रत देण्याकरीता दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी तक्रारदार यांचेकडे आरोपी कपिल तुकाराम घोरपडे, तहसिलदार पोलादपुर यांनी तीन लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी एसीबी कार्यालय ठाणे येथे प्राप्त झाली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यांत आलेल्या पडताळणीच्या दरम्यान आरोपी कपिल तुकाराम घोरपडे, तहसिलदार पोलादपुर यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची तफावतीबाबत दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशाकरीता रक्कम रूपये तीन लाखांची मागणी करून तडजोडी अंती रक्कम रूपये 2.50 लाख मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
कपिल तुकाराम घोरपडे, तहसिलदार पोलादपुर यांचेविरूध्द सापळा रचला होता. परंतू त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. सबब, आरोपी कपिल तुकाराम घोरपडे, तहसिलदार पोलादपुर, जिल्हा रायगड यांचेविरूध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे, संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे,सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड संतोष भिसे, पोलीस निरीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड, सहाय्यक फौजदार विनोद जाधव,अरूण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील,सचिन आटपाडकर, सागर पाटील यांनी केला आहे.