मुंबईठाणे
Trending

Indo-France Minsters : “पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांचा मुंबई दौरा; दक्षिण मुंबईत वाहतुकीचे मोठे बदल!”

Indo -France Minster Mumbai Visit : गेट वे ऑफ इंडिया’ येथे इंडो-फ्रान्स सांस्कृतिक सोहळा; दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद; पोलिसांचे प्रवाशांना आवाहन

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन उद्या, 17 फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून अनेक प्रमुख मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष यांच्या उपस्थितीत ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात ‘इंडो-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींचे दुपारी 2.15 वाजता मुंबईत आगमन होईल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ‘लोकभवन’ (पूर्वीचे राजभवन) येथे उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडेल. सायंकाळी 5 वाजता हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत ‘राऊंडटेबल’ चर्चा होईल आणि सायंकाळी 6.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथील मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. या व्हीव्हीआयपी दौऱ्यामुळे दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

वाहतुकीतील प्रमुख बदल आणि बंद असणारे मार्ग

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल. हा मार्ग केवळ आपत्कालीन वाहनांसाठीच खुला ठेवला जाईल.

तसेच, नॉर्थ कोर्ट ते ॲडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्गदेखील वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड आणि बीके बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड आणि जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवण्यात येईल.

महत्त्वाचे म्हणजे, ॲडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड तसेच बेस्ट बसचे थांबे या काळात बंद राहणार आहेत.

फ्रान्सच्या वाणिज्य दूतवासाच्या वतीने आयोजित हा ‘इयर ऑफ इनोव्हेशन’ कार्यक्रम 14 ते 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, 17 फेब्रुवारी हा त्याचा मुख्य दिवस आहे. दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0