मुंबईक्राईम न्यूज
Trending

Rahul Narwekar : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक..

Rahul Narwekar Email Get Hacked : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल रमेश बैस यांना मेल

मुंबई :- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekar यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ईमेल आयडी हॅक करुन राज्यपालांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी आता मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आला. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Rahul Narwekar Email Get Hacked

राज्याच्या राजकारणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणातील निकालानंतर राहुल नार्वेकर सांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र, आता राहुल नार्वेकर यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई-मेल आयडी हॅक करून त्यावरुन राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Rahul Narwekar Email Get Hacked

विधानसभा अध्यक्षाच्या मेल आयडीवरून राज्यपालांना मेल केला गेला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सोमवारी दुपारी चार वाजता लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणात मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या मेल आयडीवरून मेल करणाऱ्या तसेच त्यांचा मेल आयडी हॅक करणाऱ्या आरोपीचा शोध आता मरीन लाईन्स पोलिस घेत आहेत. मात्र या सर्व घडामोडीमुळे राज्य सरकारच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0